A collection of informational articles about bloggers, HTML tutorials and so on.
डॉ. संजय कुंडेटकर, उपजिल्हाधिकारी.
*Some frequently asked questions. More
म.ज.म.अ. च्या कोणत्याही तरतुदींन्वये नेमलेला आणि जमीन महसुलाच्या किंवा भूमापनाच्या, आकारणीच्या, हिशोबाच्या किंवा तत्संबंधी अभिलेखाच्या कामकाजात किंवा कामकाजांच्या संबंधाने नियुक्त केलेला कोणत्याही दर्जाचा प्रत्येक अधिकारी.
[म.ज.म.अ. कलम २(३१)]
भू-मापन क्रमांकाच्या क्षेत्रफळ आणि आकारणीची, भूमि-अभिलेखांत ज्या भू-मापन क्रमांकाचा तो भाग असेल त्या क्रमांकानंतर, दर्शक क्रमांक देऊन स्वतंत्रपणे नोंदणी केलेला भाग.
[म.ज.म.अ. कलम २(३५)]
लेखान्वये किंवा तोंडी करारान्वये जमीन धारण करणारा पट्टेदार किंवा कब्जासहित कुळाचे हक्क गहाण घेणारी व्यक्ती. यामध्ये प्रत्यक्षपणे राज्य शासनाकडून जमीन धारण करणाऱ्या पट्टेदाराचा समावेश होत नाही.
[म.ज.म.अ. कलम २(४०)]
भोगवटादार, कुळ किंवा शासकीय पट्टेदार यांनी धारण केलेल्या जमिनीखेरीज गावातील जमीन.
[म.ज.म.अ. कलम २(४१)]
(अ) (कुळ सोडून अन्य अशा) ज्या व्यक्ती जमीन धारण करणाऱ्या, भोगवटा करणाऱ्या, मालक किंवा जमीन गहाण घेणाऱ्या किंवा तिचे भाडे किंवा महसूल आपल्या नावे करून घेणाऱ्या असतील अशा सर्व व्यक्तींची नावे.
(ब) शासकीय पट्टेदार म्हणून किंवा संबंधित कुळकायद्याच्या अर्थकक्षेतील कुळे धरून, कुळे म्हणून ज्या व्यक्ती जमीन धारण करीत असतील अशा सर्व व्यक्तींची नावे.
(क) अशा व्यक्तींच्या परस्पर हितसंबंधाचे स्वरूप, त्याची मर्यादा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या अटी किंवा दायित्वे असल्यास त्या अटी किंवा दायित्वे.
(ड) अशा व्यक्तींपैकी कोणत्याही व्यक्तींनी द्यावयाचा किंवा त्यांना देण्याजोगा खंड किंवा महसूल, कोणताही असल्यास, तो खंड किंवा महसूल.
(इ) राज्य शासन, याबाबतीत केलेल्या नियमान्वये सर्वसामान्यपणे किंवा त्यात विनिर्दिष्ट केलेल्या कोणत्याही क्षेत्राच्या प्रयोजनांसाठी विहित करील असे इतर तपशील असलेला अभिलेख.
[म.ज.म.अ. कलम १४८]
देय झालेला आणि विहित केलेल्या दिनांकास किंवा त्यापूर्वी न दिलेला कोणताही जमीन महसूल, त्या दिनांकापासून थकबाकी होतो. आणि तो देण्यास जबाबदार असलेल्या व्यक्ती कसूर करणाऱ्या व्यक्ती ठरतात.
[म.ज.म.अ. कलम १७३]
विविध कारणांसाठी महसूल आकारणी माफ करणे म्हणजे सारा माफी.
[म.ज.म.अ. कलम ४७, ७८]