डॉ. संजय कुंडेटकर
(बी.ए; एन.डी.; डी.मॅग; एम.बी.ए; एम.डी.; पीएच. डी.)
डॉ. संजय कुंडेटकर , महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यातील वर्ग-१ दर्जाचे अधिकारी असून सन १९९५ मध्ये, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन तहसिलदार वर्ग-१ पदी रूजु झाले. त्यांनी पुणे जिल्ह्यात तहसिलदार पदावर भोर, पुणे शहर, हवेली, करमणूक कर, मुळशी इत्यादी विविध ठिकाणी काम केले.
सन २००४ मध्ये, उपजिल्हाधिकारी पदी पदोन्नती झाल्यानंतर वर्धा, हिंदूस्थान पेट्रोलियम, नागरी समूह, कोरेगाव, परभणी इत्यादी ठिकाणी उपजिल्हाधिकारी तसेच सक्षम प्राधिकारी आणि उपविभागीय अधिकारी अशा विविध पदांवर काम करून ते सन २०२१ मध्ये सेवानिवृत्त झाले.
सन २००५ ते २०१० या कालावधीत त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले तसेच निसर्गोपचार विषयात एम. डी. (अल्टरनेट मेडिसिन) ही पदवी प्राप्त करून त्यांनी सर्वसामान्य व्याधींवर अधिक प्रभावी घरगुती उपचार पद्धतींवर आधारीत ‘आयुष्यमान भव- (अधिक उपायांसह समग्र‘)’ हे पुस्तक लिहिले. त्यानंतरही घरगुती उपचार पद्धतींवर आधारीत त्यांचे लेख त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
पुढे महसूल विभागात काम करतांना, ʻकाद्यानुसार काम करा, प्रथा परंपरेनुसार नाहीʼ हा संदेश देऊन त्यांनी महसूल कायदे तरतुदींवर आधारीत २७५ पेक्षा जास्त लेख लिहिले जे त्यांच्या www.drdcsanjayk.info या वेबसाईटवर पी.डी.एफ. स्वरूपात उपलब्ध आहेत.
प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक औषधांचा उपयोग करून आजारांना दूर ठेवण्याबाबत त्यांचे अनेक लेख, अन्य माहितीपर लेखांसह त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत.
महसूल सेवेमध्ये त्यांना महसूल रत्न, डायमंड ऑफ रेव्हेन्यू, कोविड योध्दा, सेवा गौरव, शांतीदूत सेवारत्न, महाराष्ट्र बूक ऑफ रेकॉर्डस् यांसह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल नियमपुस्तिका, खंड दोन ते पाच मध्ये कालानुरूप बदल करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीवर त्यांची विशेष आंमत्रीत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
सेवा निवृतीनंतरही, आपल्या महसुली ज्ञानाचा उपयोग महसूल अधिकारी आणि नागरीकांना व्हावा या दृष्टीकोनातून त्यांनी www.youtube.com/c/MahsulGuru हे युट्युब चॅनल सुरू केले. या युट्युब चॅनलवर त्यांचे महसूल कायदे विषयक मार्गदर्शन करणारे शंभरपेक्षा जास्त व्हिडीओ आहेत.
www.talathiinmaharashtra.in ; www.mohsin7-12.blogspot.in; www.maharashtracivilservice.org या संकेत स्थळांवरही ते नेहमी सक्रिय असतात आणि विचारलेल्या कायदेविषयक प्रश्नांची उत्तरे देतात.
या लेखात, आम्ही आपणाला About Us. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !